
न्यायालयाने २० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सरकार पक्षातर्फे विशेष सहायक सरकारी अभियोक्ता अर्जुन पवार यांनी बाजू मांडली.
अहमदनगर : दरोड्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी लॉरेन्स दोराई स्वामी याला पोलिस कोठडीची मुदत संपल्याने मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्या पोलिस कोठडीत २० जानेवारीपर्यंत वाढविल्याचे आदेश न्यायालयाने दिले. दरोड्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या लॉरेन्स स्वामीसह आठ जणांविरुद्ध 'मोक्का'ची (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा) कारवाई करण्यात आली आहे.
स्वामीला 'मोक्का' न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे यांच्यासमोर हजर केले. आरोपीचे कोणकोणते व्यवसाय आहेत, त्याचा बॅंक व्यवहार, मोबाईल डाटा तपासायचा असल्याने पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी तपासी अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने २० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सरकार पक्षातर्फे विशेष सहायक सरकारी अभियोक्ता अर्जुन पवार यांनी बाजू मांडली.