
भाजपचे उमेदवार गटनेते सचिन नागपुरे यांना स्वतःसह नगरसेविका शालिनी सुखधान, अनिता डोकडे, डॉ. निर्मला सांगळे, रणजित सोनवणे, दिनेश व्यवहारे अशी सहाच मते मिळाली.
नेवासे : नेवाशाच्या उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक लक्ष्मण जगताप विजयी झाले. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपच्या दोन नगरसेविका अनुपस्थित राहिल्या. नगर पंचायतीत भाजपकडे सात नगरसेवक आहेत. त्यांना काँग्रेसच्या एका उमेदवाराने मतदान केले. परंतु त्यांच्या उमेदवारावा पराभवास सामोरे जावे लागले.
नेवासे नगरपंचायतीच्या सभागृहात आज ऑनलाइन पद्धतीने झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना प्रभारी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सहकार्य केले.
नेवासे नगर पंचायतीत शिवसेनेकडे (पूर्वीचा क्रांतिकारी पक्ष) ९, भाजपकडे ७ तर काँग्रेसचा एक नगरसेवक आहे. शिवसेनेचे गटनेते लक्ष्मण जगताप यांना स्वतःसह नगराध्यक्ष योगिता पिंपळे, मावळते उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, अर्चना जितेंद्र कुऱ्हे, सचिन वडागळे, अंबिका इरले, संदीप बेहळे, फिरोजबी पठाण, फारुक आतार यांचे मतदान झाले.
भाजपचे उमेदवार गटनेते सचिन नागपुरे यांना स्वतःसह नगरसेविका शालिनी सुखधान, अनिता डोकडे, डॉ. निर्मला सांगळे, रणजित सोनवणे, दिनेश व्यवहारे अशी सहाच मते मिळाली. या वेळी भाजपच्या सीमा मापारी, माजी नगराध्यक्ष संगीता बर्डे अनुपस्थित होत्या.
संपादन - अशोक निंबाळकर