
आजअखेर एकूण 49 लाख 240 क्विंटल साखर तयार झाली आहे. त्यात अंबालिका कारखान्याने सहा लाख 83 हजार 475 टन गाळप केले
नगर ः जिल्ह्यातील 13 सहकारी व आठ खासगी साखर कारखान्यांचे गाळप सुरु झाले आहे. आजअखेर सर्व कारखान्यांचे 56 लाख 35 हजार 30 टन उसाचे गाळप झाले असून, त्यात अंबालिका कारखान्याने आघाडी घेतली आहे. साखर उताऱ्यात नागवडे कारखाना जिल्ह्यात अव्वल आहे.
जिल्ह्यात सहकारी व खासगी एकूण 23 कारखाने आहेत. त्यातील साईकृपा-दोन व तनपुरे सहकारी साखर कारखाना सध्या बंद आहे. जिल्ह्यातील 13 सहकारी कारखान्यांनी 37 लाख दोन हजार 365, तर आठ खासगी कारखान्यांनी 19 लाख 32 हजार 665 मेट्रिक टन, असे एकूण 56 लाख 35 हजार 30 टन उसाचे गाळप केले आहे.
आजअखेर एकूण 49 लाख 240 क्विंटल साखर तयार झाली आहे. त्यात अंबालिका कारखान्याने सहा लाख 83 हजार 475 टन गाळप केले असून, सहा लाख 26 हजार 900 क्विंटल साखर तयार करून जिल्ह्यात आघाडी कायम ठेवलेली आहे.
त्याखालोखाल ज्ञानेश्वर कारखान्याने पाच लाख सात हजार 270 टन उसाचे गाळप करून चार लाख 70 हजार 950 क्विंटल साखर तयार केली आहे. तिसऱ्या स्थानी भाऊसाहेब थोरात कारखाना असून, त्यांनी चार लाख 84 हजार 150 टन उसाचे गाळप करून, चार लाख 24 हजार 260 क्विंटल साखर केली आहे.
अंबालिकाची आघाडी
अंबालिका कारखान्याने ऊस गाळपात आघाडी घेतली असली, तरी साखर उताऱ्यात नागवडे कारखाना आघाडीवर आहे. नागवडे कारखान्याचा साखर उतारा 10.11 आहे. त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर साईकृपा-एक असून, साखर उतारा 9.79 आहे.
अहमदनगर