esakal | माणसाची किंमत शुन्य असते, वाईट काळात कोणीही बरोबर नसतो
sakal

बोलून बातमी शोधा

Lecture by Bharatkumar Andhale at Shramik Junior College in Sangamner

माणसाची किंमत शुन्य असते. वाईट काळात कोणीही बरोबर नसतो, मात्र जेव्हा अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होतो तेव्हा माणूस कामास सुरवात करतो.

माणसाची किंमत शुन्य असते, वाईट काळात कोणीही बरोबर नसतो

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : माणसाची किंमत शुन्य असते. वाईट काळात कोणीही बरोबर नसतो, मात्र जेव्हा अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होतो तेव्हा माणूस कामास सुरवात करतो. त्यासाठी आपल्या अस्तित्वाची जाणीव हवी, असे प्रतिपादन संयुक्त कर आयुक्त भरतकुमार आंधळे यांनी केले. 

श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'सहजसोपी स्पर्धा परीक्षा' या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, संगमनेर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजेंद्र ढमक, पर्यवेक्षक प्रा. आप्पासाहेब गुंजाळ, वरीष्ठ महाविद्यालयातील भुगोल विभाग प्रमुख प्रा. रवींद्र गायकवाड उपस्थित होते.

आंधळे म्हणाले, स्पर्धा परीक्षा सहज सोप्या नाही तर अवघड असतात. हे आधी आपण स्वीकारायला हवे. मात्र कोणातरी या बाबत व्यवस्थित समजावून सांगितल्यास व आपणही समजावून घेतल्यास परीक्षा सोप्या सोप्या वाटू लागतात. स्पर्धा परीक्षांमुळेच मला माणसे समजली. 

माझ्या अपयशाच्या वेळी कोणी सोबत नव्हते, मात्र उत्तीर्ण झाल्याच्या क्षणाबरोबर आयुष्यच बदलून गेले. मला वेडा ठरवणारी माणसे माझे गुणगाण गाऊ लागली. युपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर माझ्या ग्रामीण भागातील युवकांची स्पर्धा परीक्षेची भीती घालवण्याच्या उद्देशाने व्याख्याने देऊ लागलो. प्रशिक्षणाला जाण्यापूर्वी सुमारे 100 व्याख्याने दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नातून अपयशापासून सुरु होवून यशापर्यंत पोचलेला जीवनपट उलगडला. वेड्या माणसांनी इतिहास घडविला आणि नंतर तो शहाण्यांनी वाचला. प्रचंड मेहनत करा, जिज्ञासा जोपासा, प्रामाणिकपणे अभ्यास करा व आईवडीलांना फसवु नका असा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शरद सावंत यांनी केले. यावेळी कला शाखेच्या समन्वयक प्रा. योगिता पाटील, वाणिज्य शाखेचे समन्वयक प्रा. राजाराम चत्तर, विज्ञान शाखेच्या समन्वयक प्रा. रंजना सानप, सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर सहकारी सहभागी झाले होते.

संपादन : अशोक मुरुमकर