
अहिल्यानगर : येथील दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाचे लिलाव झाले. यामध्ये एक नंबर लिंबाला चार हजारांचा प्रतिक्विंटलला भाव मिळाला. येथील बाजार समितीच्या आवारात १९.७५ क्विंटल लिंबाची आवक झाली. यामध्ये लिंबाला कमीत कमी दीड हजार व जास्तीत जास्त चार हजार रुपयांचा भाव मिळाला.