आभाळवाडीत भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या पडला विहीरीत

शांताराम जाधव
Wednesday, 14 October 2020

संगमनेर तालुक्यातील आभाळवाडी येथे मंगळवारी रात्री भक्ष्याच्या शोधात निघालेला बिबटा सुशिल आभाळे यांच्या विहिरीत पडला.

बोटा (अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील आभाळवाडी येथे मंगळवारी रात्री भक्ष्याच्या शोधात निघालेला बिबटा सुशिल आभाळे यांच्या विहिरीत पडला. 

सकाळी कामासाठी निघालेल्या आभाळे यांनी विहिरीत पडलेल्या बिबट्याचा आवाज ऐकला. स्थानिकांच्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क केला. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता रामदास थेटे,बाळासाहेब वैराळ,संगिता थोरात,रोहिदास भोईटे,दिलीप उचाळे,जयश्री पवार,अनंता काळे व रवि पडवळ यांनी बिबट्या सुखरूप विहिरीच्या बाहेर काढले. दहा वर्षाच्या नर बिबट्याला चंदनापुरी घाटातील निसर्ग माहिती केंद्रात पाठविण्यात आले आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A leopard fell into a well at Abhalwadi in Sangamner taluka