भक्ष्यावर टाकलेली झेप चुकली अन्‌ बिबट्या थेट गेला विहीरीत

शांताराम काळे
Sunday, 27 September 2020

अकोले तालुक्यातील माळी झाप येथे बिबट्या विहिरीत पडल्याने त्यास ग्रामस्थ व वनविभागाने क्रेनच्या सहाय्यांने पिंजरा विहिरीत टाकून वरती काढले.

अकोले (अहमदनगर) : अकोले तालुक्यातील माळी झाप येथे बिबट्या विहिरीत पडल्याने त्यास ग्रामस्थ व वनविभागाने क्रेनच्या सहाय्यांने पिंजरा विहिरीत टाकून वरती काढले. त्याला सुखरूप सुगाव नर्सरीमध्ये ठेवून त्याच्यावर पशुवैधकीय उपचार करण्यात आले. 

शनिवारी (ता. २७) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास त्रंबक मुरलीधर मंडलिक यांच्या शेतातील विहिरीत भक्ष्याच्या मागे धावत असताना भक्ष्यावर झेप मारली व ती चुकली नी बिबट्या विहिरीत पडला. सकाळी ६ वाजता त्रंबक मंडलिक शेतात गेले.

मोटार सुरु करायची असल्याने त्यांनी अगोदर विहिरीत डोकाऊन पाहिले तर त्यात बिबट्या पाहिल्याने त्यांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. तेही घटनास्थळी हजर झाले. मग तातडीने पिंजरा क्रेनच्या साहाय्याने विहिरीत टाकून त्याला पिंजऱ्यात टाकले. सुगाव नर्सरीमध्ये त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात आल्याचे वनविभागाने सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A leopard fell into a well at Mali Zap in Akole taluka