esakal | चहाचा शेवटचा घोट घेत असतानाच समजल; बिबट्याने उंच गेटवरुन उडी मारली, सर्व घटना सीसीटीव्हीत कैद
sakal

बोलून बातमी शोधा

leopard jumped from the gate of a power project in Akole taluka on record in CCTV

अरे बाबोऽऽऽ बिबट्याच्या मादीने वीज प्रकल्पातून दुपारीच साडेतीन वाजता गेटवरून उडी मारून थेट जंगलात विहार केला. त्यामुळे कर्मचारी भयभीत झाले आहेत.

चहाचा शेवटचा घोट घेत असतानाच समजल; बिबट्याने उंच गेटवरुन उडी मारली, सर्व घटना सीसीटीव्हीत कैद

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : अरे बाबोऽऽऽ बिबट्याच्या मादीने वीज प्रकल्पातून दुपारीच साडेतीन वाजता गेटवरून उडी मारून थेट जंगलात विहार केला. त्यामुळे कर्मचारी भयभीत झाले आहेत.

सिक्युरिटी गार्ड बी. एन. मोरे हे चहा घेण्यासाठी दहा मिनिटापूर्वी गेट बंद करून खाली आले नी काय ही बिबट्याची मादी बंद केलेल्या उंच गेटवरून उडी मारून बाहेर पडली. तिची आणि मोरे यांची थोडक्यात हुकाहुक झाली. अन्यथा मोरे तिच्या तावडीत सापडले असते. हा प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

कर्मचारी जीवावर उदार होऊन तिच्या डिस्चार्जची वाट पाहत आहेत. मात्र ही मादी तेथून हालण्यास तयार नसल्याने वन विभागाचे १५ दिवसात ती जागा बदलेल हा अंदाज खोटा ठरताना दिसत आहे  वनविभागाने पिंजरा शेळी व सायंकाळी एक गार्ड ठेवला असला तरी ही बिबट्याची मादी बंद असलेल्या वीज प्रकल्पातून दुपारी तीन वाजून २३ मिनिटांनी चक्क उंच गेटवरून उडी मारून जलविद्युत प्रकल्पामधून बाहेर पडत असल्याने कर्मचारी घाबरले आहेत. 

कामावर इन्चार्ज असलेले वसंत आरोटे कंट्रोल रूममध्ये असताना मॉनिटरवर चक्क बिबट्या दिसल्याने लांबसडक, शेपटी उडवीत गेटवर उंच उडी मारत तिने पलिकडे उडी मारली. जिभल्या चाटत आवाज करत तिने जंगलाकडे आपला मोर्चा वळविला. त्यामुळे त्यांचे पाय थरथरले. त्यांनी तातडीने सर्व कर्मचारी यांना सूचना दिल्या. 
वनविभागाला संपर्क केला मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

चहाचा शेवटचा घोट घेत असताना बी. एन. मोरे यांना ही माहिती कळताच देवा वाचलो म्हणत त्यांनी गेटवर न जाता कंट्रोल कबिनमध्ये बसणे पसंद केले. तीन दिवसापासून ती न दिसल्याने ती आपल्या पिल्लांना घेऊन गेली. असा समज करून कर्मचारी वर्गाने प्रवेशद्वार असलेले गेट बंद केले. मात्र तिने दुपारी सव्वाती नंतर गेट वरून उडी मारून जंगलाच्या दिशेने कूच केली. वनक्षेत्रपाल गोंदके यांनी घटनेचे वृत्त कळताच तातडीने कर्मचारी या परिसरात पाठविले. मात्र हे सोपस्कार न करता ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे या परिसरातील ग्रामस्थांचे मत आहे. 

डॉट्सन वीज कंपनीचे राजेंद्र जाधव यांनी तातडीने कर्मचारी यांना बाहेर येण्याचा सल्ला दिला आहे मात्र वनविभाग सुसस्त आहे.

संपादन : अशोक मुरुमकर