जाते बाबांनो मी! काळजी करू नका, परत पुढच्या बाळंतपणालाच येईल

शांताराम काळे
Wednesday, 30 September 2020

दोन महिने आपल्या बछडा ना जन्म देऊनही ती तेथून हलेना पिंजरा लावून पाहिला, विजेचा फोकस लावला नव्हे तर फटाके वाजवून मिरचीचा धुरही केला.

अकोले (अहमदनगर) : दोन महिने आपल्या बछडा ना जन्म देऊनही ती तेथून हलेना पिंजरा लावून पाहिला, विजेचा फोकस लावला नव्हे तर फटाके वाजवून मिरचीचा धुरही केला. पण ती हलायचे नाव घेत नव्हती. रोज सीसीटीव्हीमध्ये सायंकाळी सात रात्री ९.३०वाजता ती हमखास दिसायची. मात्र जायचे नाव घेत नव्हती. कोदनी वीज प्रकल्प तिचे माहेरघर बनले होते. 

बाळंतपणसाठी जणू ती माहेरी आली असे समजून कधी गेटवर येऊन बसायची. तर कधी गेटवर चढून राजेशाही थाटात इकडून तिकडे उडी मारायची. तिचा रुबाब पाहून कंट्रोल रूममध्ये बसलेले वीज कर्मचारी तिला सीसीटिव्हीमध्ये पाहून भयभीत व्हायचे. कुणीही कामावर लक्ष्य ठेवून नव्हे तर या मादिवर लक्ष्य ठेवून असायचे. 

वन विभागाने पिंजरा ठेऊन आपली जबाबदारी पार पाडली. तर कंपनीने भाड्याने शेळी आणली फटाके वाजविले. मिरच्या आणल्या मात्र ती मुळीच डगमगली नाही. मात्र चार दिवसापूर्वी आपल्या बछड्यांना घेऊन गेटवर आली सगळीकडे नजर फिरवली. मस्त आळस दिला मोठ्याने गुरकली. जणू जाते बाबांनो मी काळजी करू नका, परत पुढच्या बाळंतपणालाच येईल, असे सांगून ती गेली नी कर्मचाऱ्यांनी मोकळा श्वास घेतला.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The leopard went to the power sub station in Akole taluka