बायको अन्‌ मी शेतात गवत काढत होतो, मागे बघतोय तर, बिबट्याचा प्रत्यक्षदर्शीचा थक्क करणारा अनुभव 

अशोक मुरुमकर
Monday, 7 December 2020

बायको अन्‌ मी शेतात सायंकाळी गवत काढत होतो... माळाकडून (कामोणे) सीना नदीकडे बिबट्या आला... 

अहमदनगर : बायको अन्‌ मी शेतात सायंकाळी गवत काढत होतो... माळाकडून (कामोणे) सीना नदीकडे बिबट्या आला... तिथेच आम्ही नवरा बायको गवत काढत होतो... तेवढ्यात घरुन फोन आला अन्‌ वर फटाके वाजवले व बिबट्या खाली आला... गवताचे गाठोडे बांधूस्तर तो तालीवर आला. आमच्यात अन्‌ बिबट्यात फक्त ५० फुट अंतर होते. तो तालीवर अन्‌ आम्ही खाली होतो. त्यानंतर तो शेजारील (नलवडे) शेतात गेला, असं बिबट्याचे प्रत्यक्षदर्शी असलेले अळजापूर येथील सुंदर रोडे यांनी सांगितले. 

नगर व सोलापूर जिल्ह्यात सध्या बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. नगर जिल्ह्यातून बिबट्याने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात मोर्चा वळवला आहे. करमाळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोघांचा मृत्य झाला आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे.

आळजापूर हे सीना नदीवर नगर व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर गाव आहे. करमाळा तालु्क्यात रावगाव व अंजनडोह येथे झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात दोघांचे मृत्यू झाले आहेत. यामुळे प्रशासनही सज्ज झाले आहे. मात्र, अद्याप बिबट्या पकडण्यात वन विभागाला यश आलेले नाही. व्यक्तींवर बिबट्याचा पुन्हा हल्ला होऊ नये म्हणून प्रशासन प्रयत्न करत आहे. 

आळजापूर येथील रोडे याची शेती बिटरगाव (श्री), कामोणे व तरटगावच्या सीमेवर आहे. त्यांच्या शेतीपासूनच कामोणेचा माळ काही अंतरावर आहे. याबरोबर मोठा ओडाही आहे. रोडे म्हणाले, आमच्या शेतातील ऊस कारखान्याला गेला आहे. तिथेच गवत काढण्याचे काम सुरु होते. तेव्हा करमाळा- जामखेड रस्त्यावरुन नदीकडील बाजूस बिबट्या आल्याचा फोन आला. त्यानंतर मुलाला आणि आईला घराकडे पाठवले. आम्हीही निघणार होतो. त्यासाठीच काढलेले गवत एकत्र करत होतो. 

गवत जमा करत असतानाचा पत्नीने मागे बघा असं सांगितले. तर तोंडा मोठा जबडा असलेला बिबट्या तालीवर दिसला, असं आळजापूर येथील रोडे सांगत आहेत. त्यानंतर गावातील पोलिस पाटील व इतर नागरिकांना यांची माहिती दिले. सर्वजण तिथे आले मात्र, तोपर्यंत बिबट्या तेथून पसार झाला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopards in Aljapur in Karmala taluka