esakal | शेतातली कामे करतानाच अनेकांना ‘तो’ बिबट्या देतोय दर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

Leopards can be seen working with farmers in Nighoj

करोना महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले असताना पारनेर तालुक्यातील कुकडीपट्ट्यातील बागायती निघोजसह १४ गावातील ग्रामस्थ सहा महिन्यापासून बिबट्याच्या दहशतीखाली आहेत.

शेतातली कामे करतानाच अनेकांना ‘तो’ बिबट्या देतोय दर्शन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निघोज (अहमदनगर) : करोना महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले असताना पारनेर तालुक्यातील कुकडीपट्ट्यातील बागायती निघोजसह १४ गावातील ग्रामस्थ सहा महिन्यापासून बिबट्याच्या दहशतीखाली आहेत.

शेतीकामे करताना अनेकांना हा बिबट्या दर्शन देत असल्याने या गावांमधील नागरीक भितीच्या सावटाखाली आहेत. बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली असली तरी अपुर्या पिंजर्या अभावी या बिबट्याला पकडण्यात अद्याप अपयशच आले आहे. 

करोना महामारीच्या संकट वाढत असुन दिवसेदिवस कुकडी पट्ट्यातील रुग्णांची संख्या वाढत चालली असताना कुकडीच्या बागायती पट्यातील निघोजसह वडनेर, पठारवाडी, देविभोयरे जवळा ,राळेगण थेरपाळ आदी गावामध्ये शेतीची कामे करताना अनेकांना बिबट्याचे दर्शन घडले आहे. बिबट्याच्या हल्यात काही जनावरेही दगावली आहेत.

त्यामुळे येथील नागरीकांमध्ये सध्या घबराटीचे वातावरण पसरले आहे. आज सकाळीच वडनेर येथील चौधरी मळ्यात बिबट्या दिसल्याने येथील ग्रामस्थ घाबरले आहेत.कुकडी कँनलमुळे हा परीसर बागायती आहे.त्यामुळे या परीसरात शेतीची कामे मोठ्या प्रमाणात सुरु असतात. तर शेतीसाठी विजेचे भारनियमन सुरुच असल्याने रात्री शेती पिकाला पाणी द्यावे लागते. परंतु बिबट्याचा वावर असल्याने भितीमुळे कामे खोळंबुन राहतात.

वनविभागाकडुन सध्या जवळा, राळेगण थेरपाळ ,कुरुंद, देविभोयरे व रेनवडी या गावामध्ये बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत. मात्र तरीही या बिबट्याचा मुक्त संचार सुरुच आहे.त्यामुळे येथील ग्रामस्थही भयभित आहेत. या बिबट्याचा कायमस्वरुपी बंदोबंस्त करावा अशी मागणी वनविभागाकडे करण्यात येत आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर