esakal | बापरे! पारनेर तालुक्यात दिसलेला तो पट्टेरी वाघ नसुन...
sakal

बोलून बातमी शोधा

Leopards in Takli Dhokeshwari village in Parner taluka

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गावांमध्ये काही दिवसांपासुन बिबट्या व पट्टेरी वाघाचे वास्तव्यास असल्याच्या चर्चा सुरू असतानाच येथील धुमाळ वस्तीवरील रहीवास्यांनी बिबट्या परीसरात फिरतानाचे छायाचित्र काढले आहे.

बापरे! पारनेर तालुक्यात दिसलेला तो पट्टेरी वाघ नसुन...

sakal_logo
By
सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गावांमध्ये काही दिवसांपासुन बिबट्या व पट्टेरी वाघाचे वास्तव्यास असल्याच्या चर्चा सुरू असतानाच येथील धुमाळ वस्तीवरील रहीवास्यांनी बिबट्या परीसरात फिरतानाचे छायाचित्र काढले आहे. त्यामुळे गावात दिसणार पट्टेरी वाघ नसुन बिबट्याच असल्याचे समोर आले आहे.

याबाबत माहीती अशी की मागील काही दिवसांपासून येथील धुमाळ वस्तीवरील तलाव परीसरात दोन बिबट्याची जोडी फिरत आहेत याची एक व्हीडिओ किल्प देखील सोशल नेटवर्किंग साईटवर व्हायरल झाली होती यामध्ये काही  नागरिकांनी हे पट्टेरी वाघ असल्याचे बोले होते मात्र वनविभागाकडुन याचे खंडन करण्यात आले होते त्या किल्प मध्ये देखील अस्पष्ट रीत्या दोन वन्य जीव फिरताना दिसत होते.

हरणांसह इतर वन्य प्राण्यांची या परीसरात मोठ्या प्रमाणात संख्या असल्याने बिबट्या चे वास्तव्य या ठिकाणी असल्याचे ग्रामस्थ सांगतात या ठिकाणी गावातील सामाजिक कार्यकर्ते दादा झावरे याच्या सहं स्थानिक नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार वनविभाकडुन पिंजरा देखील लावण्यात आला पिंज-यात शेळी,कोंबडी देखील 

ठेवण्यात आली मात्र बिबट्या तिकडे फिरकला देखील नसल्याचे स्थानिक रहीवासी सांगत आहे.त्यानंतर शेळी देखील त्यातुन काढुन घेण्यात आली आता सध्या मोकळा पिंजरा शेतात लावण्यात आला आहे.

तिथे हरणांची संख्या मोठी असल्याने बिबट्या पिंज-यात येईल की नाही याबाबत शंका असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.मात्र यामध्ये सातत्याने शेळी किंवा अन्य प्राणी ठेवण्यात यावा अशी मागणी झावरे यांनी केली आहे. येथील संदीप झावरे,योगेश धुमाळ यांनी यातील एका बिबट्याचे परीसरात फिरतानाचे छायाचित्र काढले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर