
राज्यातील वकीलवर्गासाठी महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल तळमळीने काम करीत आहे.
नगर : "राज्यातील वकीलवर्गासाठी महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल तळमळीने काम करीत आहे. वकिलांसाठी कोविड उपचारासह ग्रुप आरोग्यविमा सुरू केला आहे, तसेच सदस्यांसाठी पेन्शन योजनाही राबवीत आहोत. नगरच्या न्यायालयाच्या इमारतीचे व वकिलांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मार्ग काढणार आहोत,'' असे आश्वासन महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. सुभाष घाडगे यांनी दिले.
महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ऍड. सुभाष घाडगे, माजी अध्यक्ष ऍड. विठ्ठल कोंडे देशमुख, सदस्य ऍड. सुदीप पासबोला, ऍड. उदय वारुंजीकर आदींनी जिल्हा न्यायालयाला भेट दिली असता, सेंट्रल बार असोसिएशनतर्फे अध्यक्ष ऍड. सुभाष काकडे, उपाध्यक्ष ऍड. समीर सोनी, महिला उपाध्यक्ष ऍड. मंगला गुंदेचा, सचिव ऍड. योगेश काळे, खजिनदार ऍड. अभिजित देशपांडे आदींनी सर्वांचे स्वागत केले.
संपादन : अशोक मुरुमकर