esakal | जीवनात साहित्य व खेळ असेल तर जीवन आनंददायी
sakal

बोलून बातमी शोधा

Life is enjoyable if there is literature and sports in life

जीवनात साहित्य व खेळ असेल तर जीवन आनंददायी होते.

जीवनात साहित्य व खेळ असेल तर जीवन आनंददायी

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : जीवनात साहित्य व खेळ असेल तर जीवन आनंददायी होते. समाजाच्या तसेच मानसांच्या विविध कृती व जीवन मधूनच खऱ्या अर्थाने जीवंत साहित्याची निर्मिती होत असते, असे प्रतिपादन आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपट पवार यांनी केले.

पारनेरच्या राज्य साहित्य परिषद व मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा श्रीसंत तुकाराम महाराज साहित्य व कला पुरस्कार वितरण पवार यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्ताने काव्य संमेलनही आयोजीत केले होते.

यंदाचा साहित्य पुरस्कार संजय कळमकर तर कला पुरस्कार मिलिंद शिंदे यांना जाहीर करण्यात आला होता. पवार यांच्या हस्ते कळमकर यांना साहित्य पुरस्काराचे प्रदान करण्यात आले. तसेच विशेष पुरस्कारात शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान असलेल्या श्री समर्थ शिक्षण संस्थेचे संस्थापक कैलास गाडीलकर व रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष बापूसाहेब भूमकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.पुरस्काराचे हे 15 वे वर्ष होते.
पवार पुढे म्हणाले, संत तुकाराम महाराजांचे साहित्य म्हणजे समाज मनाचा आरसा होय. आज जगाला भेडसावणारा पर्यावरणाचा प्रश्न त्या काळी त्यांना समजला.  देशात व राज्यात अनेक संत होऊन गेले त्यांनी समाजाला चांगली दिशा दिली मात्र समाजाने संताचे जात व मतांच्या  राजकारणात विभाजण केले.समाजावर येणा-या संकाटातूनच नविन व चांगल्या साहित्याची निर्मिती होते.  साहित्य हेच खरे मानसिक आजारावरील उपचाराचे प्रमुख साधन आहे. यंदाचे 2020 साल हे कोरोनामुळे मानवाला घातक असले तरी पर्यावरण व पशू पक्षांसाठी चांगले ठरले आहे. कोरोनाने मानवाला चांगली  अचारसंहिता शिकविली आहे. दरवर्षी संपुर्ण जगात एक महिना लॉडकडाऊन केले पाहिजे असेही पवार शेवटी म्हणाले.

सत्काराला उत्तर देताना कळमकर म्हणाले, साहित्य हे जनमासात  रूजणारे असावे.  मात्र सध्या श्रेष्ठ साहित्यालाच पुरस्कार मिळतात  ते साहित्य फक्त पुरस्कारासाठीच लिहले जाते. खरे पहाता  साहित्यातून मनोरंजण होणे गरजेचे आहे. अनेकांचे साहित्य पुरस्कार व सन्मान मिळविण्यासठीच असते.

साहित्यीकांनी समाजाला जे आवडते तेच लिहणे गरजेचे आहे. आपल्याला काही तरी मिळेल या भावनेतून साहित्याची निर्मिती होऊ नये.पवार व इंदोरीकर महाराज यांचे नांव विधनपरीषदेसाठी सुचविले आहे मात्र पवार यांनी जाऊ नये त्यांची उंची त्याही पेक्षा खूप मोठी आहे. मात्र इंदोरीकरांनी जावे कारण त्यांना तीन तास किर्तण करण्याची सवय आहे त्यामुळे किमान तीन  तास सभागृह चालू राहील असेही कळमकर म्हणाले.

नुकताच जिल्हा परीषदेने जे शिक्षक आईवडीलांना सांभाळत नाहीत त्यांच्या पगारातून 30 टक्के रक्कम कपात करूण ती आई वडिलांना देण्यात  यावी असा ठराव केला आहे. हा ठराव चांगला आहे. मात्र ज्यांनी हा ठराव केला ते तरी त्यांच्या आईवडीलांना सांभाळतात का याचा शोध घेतला पाहीजे. व त्याचा शोध घेण्यासाठी आम्ही मोफत सर्वेक्षण करू, असे संजय कळमकर यांनी सांगितले.

प्रास्ताविक महाराष्ट्र साहित्य परिषद पारनेर शाखा व मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश औटी यांनी केले. या वेळी आमदार निलेश लंके,परिवहन अधिकारी पद्माकर भालेकर, पुरूषोत्तम सदाफुले, रा.या. औटी, अशोक बागवे, संजय वाघमारे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थीत होते.  पुरस्कार वितरण सोहळ्या नंतर काव्य संमेलनही संपन्न झाले.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image