
शिर्डी : साईसंस्थानच्या रुग्णालयात नांदेड जिल्ह्यातील चांडोळा येथील रहिवासी असलेले प्रल्हाद महाजन साखरे (वय ६५) यांच्यावर गुंतागुंतीची व अवघड समजली जाणारी शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. ते बरे होऊन काल घरी परतले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांच्या हृदयाच्या एका झडपेला छिद्र पडले होते. विविध रुग्णालयांनी जोखीम लक्षात घेऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यास असमर्थता व्यक्त केली होती. साईसंस्थान रुग्णालयातील ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. श्रेयस पोतदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.