
-दत्ता उकिरडे
राशीन : प्रसूतिदरम्यान मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या खिलार जातीच्या गाईची सुमारे साडेतीन तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रेरणा सावळे यांनी गाईला जीवदान दिल्याने तिच्या धन्याच्या डोळ्यात अक्षरशः आनंदाश्रू तरळले.