
सोनई : देवगड येथील भगवान दत्तात्रेय मंदिरासमोर गुरुवारनिमित्त सायंकाळी पाच वाजता चिमुकल्या वारकऱ्यांनी हरिपाठाची सेवा देताना मृदंगाची थाप, उत्कृष्ट गायनाचा सूर व एक ठेका धरून केलेले टाळ वादन उपस्थित भक्तांना मंत्रमुग्ध करणारे ठरले. महंत भास्करगिरी महाराज यांच्या उपस्थितीत उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज आणि बाल वारकऱ्यांनी पावली आणि फुगडीचा आनंद घेतला.