जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, साईसंस्थानसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या देवस्थानावर विश्वस्त मंडळ नियुक्त केलेले नाही. त्यामुळे दैनंदिन कामकाज करताना अडचणी येतात.
शिर्डी ः सरकारी व निमसरकारी समित्यांवर तातडीने नियुक्त्या कराव्यात, तसेच साईसंस्थानच्या नियोजित विश्वस्त मंडळात निम्मी संख्या स्थानिकांची असावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर व माजी उपनगराध्यक्ष नीलेश कोते यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली.
मंत्री मुश्रीफ यांनी आज येथे येऊन साईदर्शन घेतले. संदीप वर्पे, राजेंद्र फाळके, सुधाकर शिंदे, महेंद्र शेळके, अमित शेळके, संदीप सोनावणे, दीपक गोंदकर आदी उपस्थित होते.
जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, साईसंस्थानसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या देवस्थानावर विश्वस्त मंडळ नियुक्त केलेले नाही. त्यामुळे दैनंदिन कामकाज करताना अडचणी येतात.
साईसंस्थान कामगारांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. विकासकामांना गती द्यायची आहे. भाविकांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी, त्यांना सुलभ साईदर्शन घेता यावे, यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांना साईसंस्थानच्या विश्वस्तपदी संधी मिळणे गरजेचे आहे. विविध सरकारी समित्या व मंडळांवर संधी मिळाल्यास कार्यकर्त्यांना बळ मिळेल. पक्षसंघटन मजबूत करण्यास मदत होईल, अशी मागणी मंत्री मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.