शिर्डीत सेंट्रल बँकेला टाळे, सर्वच कर्मचारी बाधित

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

सेंट्रल बॅंकेच्या शहरातील शाखेत सॅनिटायरची सुविधा, अंतर पाळण्यात येत होते. नगरपंचायत कर्मचारी शाखा कार्यालयात येऊन औषधफवारणीही करीत. मात्र, सर्व काळजी घेऊनही अवघ्या चार दिवसांत सर्व कर्मचाऱ्यांना कोविडने गाठले.

शिर्डी ः सेंट्रल बॅंकेच्या शहरातील शाखेतील सर्व नऊ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोविड संसर्ग झाला. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून ही शाखा बंद ठेवण्याची वेळ व्यवस्थापनावर आली. कोविड संसर्गामुळे एखाद्या बॅंकेची शाखा बंद करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

शहरात कोविड संसर्ग वेगाने फैलावत आहे. शहरात सध्या 33 कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 
सेंट्रल बॅंक शाखेत प्रामुख्याने साईसंस्थान कर्मचाऱ्यांचे आर्थिक व्यवहार सर्वाधिक होतात. गेल्या 9 सप्टेंबरपासून येथील कर्मचाऱ्यांना कोविडचा संसर्ग होण्यास सुरवात झाली. त्यानंतर दोन-चार दिवसांतच सर्वांना बाधा झाली.

कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही संसर्ग झाला. शाखेत कर्मचारी वर्ग अपुरा पडू लागल्याने, कोपरगाव शाखेतून काही कर्मचारी येथे दाखल झाले. मात्र, त्यांनाही त्रास सुरू झाला. 

शहरात कोविडचा फैलाव वेगाने होत आहे. बॅंकेत रोज 250-300 ग्राहक येतात. दैनंदिन दीड कोटींहून अधिक उलाढाल होते. ग्राहकांची गर्दी असणाऱ्या शाखेतून आणखी संसर्ग फैलावण्याची धोका लक्षात घेऊन नगरपंचायतीने ही शाखा बंद करण्याबाबतचे पत्र बॅंकेला दिले. त्यामुळे बुधवारपासून (ता.16) शाखेला कुलूप लावण्यात आले. शाखेच्या दरवाजावर नगरपंचायतीच्या पत्राची प्रत चिकटविली आहे. 

सर्व काळजी घेऊनही बाधा 
सेंट्रल बॅंकेच्या शहरातील शाखेत सॅनिटायरची सुविधा, अंतर पाळण्यात येत होते. नगरपंचायत कर्मचारी शाखा कार्यालयात येऊन औषधफवारणीही करीत. मात्र, सर्व काळजी घेऊनही अवघ्या चार दिवसांत सर्व कर्मचाऱ्यांना कोविडने गाठले. मास्क न लावता बेजबाबदारीने वागणाऱ्या मंडळींकडून ही बाधा झाली असावी, अशी शक्‍यता कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lock to Central Bank in Shirdi, Corona patient to all staff

Tags
टॉपिकस
Topic Tags: