

-राजू नरवडे
संगमनेर : येथील लोकपंचायत संस्थेच्या माध्यमातून श्रीमती चंद्रकला नारायण मालपाणी महिला आधार केंद्राच्या माध्यमातून संगमनेर व अकोले तालुक्यांतील साठ गावांमध्ये अनेक वर्षांपासून कौटुंबिक हिंसाचारातील महिलांचे वाद मिटवले, तर या महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण दिले जात असून, आतापर्यंत दोन हजारांपेक्षा जास्त महिलांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून दिला आहे.