Nilesh Lanke : लोकसभेतील यश जनतेचा विश्वासच : खासदार नीलेश लंके; विश्वासाच्या उतराईसाठी खंबीरपणे उभा राहीन
निवडणूक सर्वसामान्य जनतेने दिलेल्या प्रेमाची आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमांची साक्ष आहे. या विश्वासाची उतराई करण्यासाठी नेहमी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन आणि विकासाचे प्रश्न निश्चित मार्गी लावीन.
MP Nilesh Lanke expressing gratitude towards the people after his Lok Sabha 2024 victory, promising dedicated service in return for their trust.Sakal
कोरडगाव : लोकसभा निवडणुकीतील यश कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे व जनतेच्या विश्वासाचे फलित आहे, असे प्रतिपादन खासदार नीलेश लंके यांनी केले. कोरडगाव येथे नीलेश लंके प्रतिष्ठानतर्फे आयोजित नागरी सत्कार व पेढे तुला कार्यक्रमात ते बोलत होते.