वरच्या गोण्यांत नारळाचा भुस्सा, खाली आढळला 80 लाखांचा गांजा

nagar
nagaresakal

लोणी (जि.अहमदनगर) : गुरूवारी (ता. 26) रात्री उशिरा लोणी-संगमनेर रस्त्याने चंद्रपूर बसथांब्यासमोर रात्रीची गस्त घालीत असताना लोणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील यांना एका वाहनाचा संशय आला. पोलीसांनी चौकशी करताच चक्क ८० लाखांचे घबाड मिळाले. लोणी पोलिसांनी केलेली ही कारवाई जिल्ह्यातील मोठी कारवाई समजली जात आहे. काय घडले नेमके?

वरच्या गोण्यांत नारळाचा भुस्सा; खाली चक्क ८० लाखांचे घबाड

लोणी-संगमनेर रस्त्याने चंद्रपूर बसथांब्यासमोर रात्रीची गस्त घालीत असताना लोणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील यांना एका वाहनाचा संशय आला. चौकशी केली असता समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने वाहन ताब्यात घेतले. गाडीत अनेक गोण्या होत्या. वर ठेवलेल्या गोण्यांमध्ये नारळाचा भुसा भरलेला होता, मात्र खालील काही गोण्यांची तपासणी केली असता, गांजा व गुंगीची औषधे असल्याचे आढळून आल्याने संशय बळावला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांनी भेट देऊन पंचनामा केला असता, 20 गोण्यांमधून तब्बल पाचशे दहा किलो गांजा मिळून आला.

nagar
तहसीलदाराने हडपली चक्क नैसर्गिक आपत्ती मदतीची रक्कम!

20 गोण्यांमधून तब्बल 510 किलो गांजा

रात्रीची गस्त घालत असताना अवैध गांजाची तस्करी करणाऱ्या वाहनाची झडती घेत लोणी पोलिसांनी अंदाजे 80 लाख रुपये किमतीचा 510 किलो गांजा केला जप्त केला. पकडलेल्या वाहनात वर नारळाच्या भुश्‍याच्या गोण्या होत्या, तर खाली गांज्याच्या गोण्या ठेवलेल्या होत्या. लोणी पोलिसांनी केलेली ही कारवाई जिल्ह्यातील मोठी कारवाई समजली जात आहे. पोलिसांनी गांजातस्करी करणारे वाहन व सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. वाहनचालक राहुल बाबासाहेब पवार (वय 32, रा. कसबा गल्ली, खर्डा) व दत्ता मारुती चव्हाण (वय 35) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, पोलिस निरीक्षक समाधान पाटील यांच्यासह पोलिस नाईक दीपक रोकडे, पोलिस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र औटी, सहायक फौजदार बाबासाहेब लबडे, संपत जायभाये, कैलास भिंगारदिवे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

nagar
...म्हणून संजय राऊतांनी पोलीस आयुक्तांची थोपटली पाठ!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com