कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रावणानिमित्त घरीच घेता येणार महादेवाचे दर्शन 

अशोक निंबाळकर
Wednesday, 22 July 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील भाविकांना महादेवाचे दर्शन व अभिषेक करण्यासाठी निवारा मित्र मंडळाने ऑनलाइन दर्शन व अभिषेक व्यवस्था केली आहे.

कोपरगाव (अहमदनगर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील भाविकांना महादेवाचे दर्शन व अभिषेक करण्यासाठी निवारा मित्र मंडळाने ऑनलाइन दर्शन व अभिषेक व्यवस्था केली आहे. निवारा चॅरीटेबल ट्रस्ट महादेव मंदिराच्या व्यवस्थापक समितीच्या प्रमुख माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे यांनी ही माहिती दिली.

कोयणे म्हणाल्या, कोरोनाच्या पार्श्वभूभीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन व संचारबंदीमुळे मंदिर उघडे ठेवता येत नाही. त्यामुळे 35 वर्षाची परंपरा खंडित होणार आहे. या महादेव मंदिरात श्रावणात भाविकांकडून दररोज अभिषेक केला जात होता. सद्य स्थितीत श्रावणात हे मंदिर उघडता येत नाही. परंतु सोमवारी सर्व भविकांचे वतीने एक दांपत्य अभिषेकास बसणार आहे. हा अभिषेक सर्व भाविकांना ऑनलाइन बघता येईल. मंत्रोच्चार घरी बसून ऐकता येतील.

सर्व भाविकांनी आपापल्या घरी सकाळी 8 वाजता ताम्हणामध्ये महादेवाची पिंड किंवा सुपारी ठेऊन गुरु सांगतील त्याप्रमाणे महादेवाला बेल, फुले अर्पण करून महादेवास अभिषेक करावयाचा आहे. निवारा, सुभद्रानगर, ओमनगर, रिद्धी सिद्धी नगर, कोजागिरी कॉलनी, द्वारकानगरी,जानकी विश्व, साई सीटी, समतानगर, शिंदे शिंगी नगर आदी परिसरातील भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahadev darshan can be taken online the occasion of Shravan on the background of Corona