Shevgaon: ऋतूचक्र बदलाचा पिकांना फटका ! अवकाळीने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे

बोधेगावसह (ता. शेवगाव) परिसरात गेल्या पाच दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
Shevgaon: ऋतूचक्र बदलाचा पिकांना फटका ! अवकाळीने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे
Updated on

Bodhegaon Ahmednagar News: बोधेगावसह (ता. शेवगाव) परिसरात गेल्या पाच दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. परंतु काही प्रमाणात उभ्या असलेल्या पिकांवर देखील सततच्या पावसाने रोगराई पडत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सध्या जिल्ह्यात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेवगाव तालुक्यातील बोधेगाव, बालमटाकळी, अंतरवाली, राणेगाव, शिंगोरी, हातगाव, मुंगी, कांबी, चापडगाव परिसरात

अवकाळी पाऊस व सततच्या ढगाळ हवामानामुळे तूर, कांदा, कपाशी पिकांचे नुकसान होत आहे. उभ्या पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आणखी नवे संकट उभे राहिले आहे.

मागील दोन वर्षापासून पावसाचे चक्र पूर्णपणे बदलले असून, प्रत्येक मोसमात अवकाळी व अवेळी पडणाऱ्या पावसाने पिके भुईसपाट होत आहेत. चालू खरीप हंगामात कपाशीची लागवड उशिराने झाली. परंतु ऐनवेळी पावसाने पाठ फिरवल्याने कपाशी उत्पादनावर त्याचा परिणाम पहायला मिळाला.

उरल्यासुरल्या कपाशी पिकातून घरखर्च भागून उसनवारी देता येईल, या आशेवर कपाशी पिकाकडे पाहिले जात असताना अवकाळी पावसाने कपाशी पिकाबरोबर तूर पिकाचे होत्याचे नव्हते झाले. रब्बी हंगाम ऑक्टोबर महिन्यात सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून काही प्रमाणात गहू, हरभरा करण्यात आला. (Latest Marathi News)

Shevgaon: ऋतूचक्र बदलाचा पिकांना फटका ! अवकाळीने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे
Akshay Kumar: अक्षय कुमार - माधवनचा नवीन सिनेमा, दिसणार 'या' वकीलाची गोष्ट

यामध्ये गहू, हरभऱ्याची पिकं ताशी लागली. परंतु कोवळा कोंब सततच्या पावसामुळे पिवळा पडला आहे, तर काहींचा गहू पाण्याचे प्रमाण जास्त झाल्याने भिजट होऊन उगवलाच नाही. सततच्या पावसामुळे कांद्याची रोपे व लागवड केलेल्या कांद्यावर देखील रोगांचा प्रादुर्भाव झाला. कांदा व कपाशीवर केलेला खर्च वाया जाऊ नये, यासाठी बळीराजाकडून ते वाचवण्यासाठी औषध फवारणी केली जात आहे. पिकांवरील रोगांबाबत मार्गदर्शनासाठी कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडल कृषी अधिकारी तात्यासाहेब दिवटे यांनी केले आहे.

भुसार पिकाकडे शेतकऱ्यांची पाठ

■ एकूण पीक खर्चाच्या मानाने भुसार पिकाचे उत्पादन कमी होत असल्याने आणि खर्च प्रमाणापेक्षा जास्त होत असल्याने या भागात कपाशी, उसासारखी नगदी पिके घेतली जाते. त्यामुळे बाजरी, ज्वारी, गहू या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाल्याचे पहायला मिळत आहे. (Latest Marathi News)

Shevgaon: ऋतूचक्र बदलाचा पिकांना फटका ! अवकाळीने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे सर्व निकाल हाती; दिवसभरात कशी होती राजकीय रस्सीखेच वाचा एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com