
कर्जत : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेची ६६ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा २७ ते ३० मार्च दरम्यान कर्जत येथे रंगणार आहे. ही स्पर्धा आमदार रोहित पवार, कर्जत तालुका तालीम संघ आणि नगर जिल्हा तालीम संघातर्फे आयोजित केल्या आहेत. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केली आहे.