अहिल्यानगर : राज्यातील साखर कामगारांचे तब्बल २५ महिन्यांचे पगार थकल्याने ते आक्रमक झाले आहेत. त्यांचा संप झाल्यास हंगामापुढील अडचणी वाढणार आहेत. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ आंदोलनावर ठाम आहेत..संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक सांगली येथे झाली. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप १६ डिसेंबर रोजीच्या पहाट पाळीपासून पुकारला आहे. साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगार बेमुदत संपाच्या निर्णयाप्रमाणे राज्यातील सर्व साखर कामगार पुढील मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत, अशी माहिती राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस शंकरराव भोसले यांनी दिली..Mahabaleshwar News : महाबळेश्वरला डिजिटल स्क्रिनचा उपक्रम; मुख्याधिकाऱ्यांची संकल्पना .राज्यात सहकारी १०० साखर कारखाने आहेत, तर १०४ खासगी आहेत. त्यात जिल्ह्यातील २३ कारखान्यांचा समावेश आहे. त्यात सुमारे पावणेदोन लाख कामगार आहेत. कारखान्याचा एम. डी., चिफ केमिस्ट, चिफ इंजिनिअर, चिफ अकाउंटंट, शेतकी अधिकारी या व्यतिरिक्त सर्व कामगार या संज्ञेत मोडतात. जिल्ह्यात १३ हजार कामगार आहेत. या कामगारांचे विविध प्रश्न आहेत..राज्यात पावणेदोन लाख साखर कामगार आहेत. अहिल्यानगर जिल्हा वगळता राज्यात बहुतांशी जिल्ह्यातील कारखानदारांनी पगार थकवले आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशमध्ये तब्बल २० ते २५ महिन्यांचे पैसे दिलेले नाहीत. बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर नगरमधील स्थिती बदलली. इतर ठिकाणचे चित्र गंभीर आहे. त्यासाठी दोन संघटना आक्रमक झाल्या आहेत. संप झाल्यास गळितावर परिणाम होईल. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे...या आहेत मागण्यासाखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांचे वेतन व सेवाशर्ती ठरविण्याबाबत त्रिपक्ष कमिटी गठीत करावी. साखर उद्योगातील कामगारांचे थकीत वेतन मिळालेच पाहिजे. साखर उद्योगातील रोजंदारी, कंत्राटी, नैमित्तीक व तात्पुरते काम करणाऱ्या कामगारांनाही त्रिपक्षीय समितीच्या कराराप्रमाणे अंमलबजावणी करून वेतनवाढ समान कामाला समान वेतन मिळावे. भाडेतत्त्वावर व भागीदारीने व विक्री केलेल्या, तसेच खासगी साखर कारखान्यातील कामगारांना त्रिपक्षीय समितीच्या कराराप्रमाणे वेतन आदी मागण्या आहेत..Marigold flowers : झेंडूवर फिरवला रोटाव्हेटर, चंदनापुरीतील घटना ; खर्चही निघाला नाही.कामगारांच्या वेतनाबाबत दर तीन वर्षांनी करार केला जातो. मार्चमध्ये कराराची मुदत संपली. मात्र, अद्यापि त्यावर सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. किमान १९ हजार रोजंदारी आणि थकीत वेतनासाठी हा लढा आहे.- आनंद वायकर, सरचिटणीस, साखर कामगार महासंघ..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.