अकोले तालुक्यात ठाकरे सरकारच्या आदेशाची भाजपकडून होळी

शांताराम काळे
Wednesday, 7 October 2020

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने या कृषी कायद्याच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे. 

अकोले (अहमदनगर) : येथे भाजपाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केलेल्या कृषी विषयक विधेयकाला मंजूर करुन शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडविणारे पाऊल उचलले आहे. माञ राज्यातील महाविकास आघाडी सरकारने या कृषी कायद्याच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे. 

हा शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी राज्यात आज या स्थगिती आदेशाची होळी करण्यात आली. या आंदोलनामध्ये तालुका व शहरातील सर्व भाजपा लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सर्व आघाड्यांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.
 
उत्तर नगर जिल्हाचे सरचिटणीस जालिंदर भाऊ वाकचौरे, तालुक्‍याचे अध्यक्ष सीताराम पाटील भांगरे, संघटन सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, राज गवंदे, जेष्ठ नेते यशवंत आभाले, मछिंद्र मंडलिक, विजय भांगरे, सुनील उगले, सुशांत वाकचौरे, ज्ञानेश पुंडे, अशोक आवारी, सलीम पठाण, मदन आंबरे, शैलेश फटांगरे, राहुल चव्हाण, ओंकार कदम, युवा नेते राहुल देशमुख, शहराचे हितेश कुंभार उपस्थित होते. माजी आमदार वैभव पिचड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

संपादन : सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Mahavikas Aghadi government in the state has postponed the implementation of the Agriculture Act