
शेवगाव : महावितरणने मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या १६ घरगुती ग्राहकांवर १९ लाख ५० हजार, तर ११ व्यावसायिक ग्राहकांवर १६ लाख ५० हजार अशा एकूण २७ वीज ग्राहकांवर ३६ लाख रुपयांची वीज चोरीची दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, तर भाजपच्या एका प्रतिष्ठीत पदाधिकाऱ्याची वीजचोरी उघड झाली आहे.