esakal | भावासह पुतण्याच्या मारहाणीत एकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

In Mahegaon two brothers got into a quarrel over a dispute over the pipeline from the farm

याप्रकरणी मधला भाऊ दत्तात्रय पुंजाहरी आढाव यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच मोठ्या भावास अटक केली. 

भावासह पुतण्याच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राहुरी (अहमदनगर) : तालुक्‍यातील माहेगाव येथे शेतातून पाईपलाईन नेण्याच्या वादातून दोघा सख्ख्या भावांत मंगळवारी (ता.6) दुपारी साडेतीन वाजता भांडण झाले. त्यात मोठ्या भावाने व पुतण्याने केलेल्या मारहाणीत लहान भाऊ गंभीर जखमी झाला. नगर येथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मधला भाऊ दत्तात्रय पुंजाहरी आढाव यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच मोठ्या भावास अटक केली. 

दत्तात्रय पुंजाहरी आढाव (वय 55, रा. माहेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या शेतातील कूपनलिकेचे पाणी ज्ञानेश्‍वर आढाव यांच्या शेतात घेऊन जाण्यासाठी मी व ज्ञानेश्‍वर विष्णू पुंजाहरी आढाव (वय 57) याच्या शेतातून जलवाहिनी टाकत होतो. यावेळी आमच्या शेतातून जलवाहिनी नेऊ नका, असे सांगून विष्णू आढाव व त्याचा मुलगा प्रतीक यांनी ज्ञानेश्‍वर यास शिवीगाळ करून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

प्रतीक याने ज्ञानेश्‍वर यांच्या छातीवर खोरे मारून त्यांना खाली पाडले. तसेच दोघांनी जबर मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्‍वर यांना नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी विष्णू आढाव यास अटक केली असून, प्रतीक आढाव फरारी आहे.

loading image