
-शांताराम काळे
अकोले : घरची परिस्थिती बेताची. अतिदुर्गम भाग असलेल्या विहीर गावात शिक्षणाची सुविधा नाही. बारावी विज्ञान शाखेत तब्बल चार विषयात नापास झाला. तरीही खचला नाही. पुन्हा नव्या जोमाने बारावीची परीक्षा दिली. त्यानंतर उच्च शिक्षण घेतले. एमपीएससीची परीक्षा दिली अन महसूल अधिकारी पदाला गवसणी घातली. ही यशोगाथा आहे, महेश पांडुरंग वेडे याची. इतरांना प्रेरणादायी असा हा प्रवास आहे.