The Mahijalgav rest house stands abandoned, with public works department failing to maintain it properly.Sakal
अहिल्यानगर
Mahijalgaon : माहीजळगावातील विश्रामगृह धूळखात पडून : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; कर्मचाऱ्यांचा वानवा
Ahilyanagar News : वीज पुरवठा बिल न भरल्यामुळे तोडण्यात आला आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारात ते तळीरामाचा अड्डा बनले आहे, तसेच या दुर्लक्षित इमारतीच्या प्रांगणात कचऱ्याचा ढिगारा साठला आहे. त्यामुळे ते तातडीने सुरू करावे.
नीलेश दिवटे
कर्जत : तालुक्यातील अहिल्यानगर-सोलापूर व जामखेड - श्रीगोंदे या राष्ट्रीय महामार्गावर असलेले माहीजळगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह देखभालीअभावी धुळखात पडले आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. ते तातडीने सुरू करावे, अशी मागणी आहे.

