
टाकळीमियाच्या दिंडीला भीषण अपघात ; पिकअपच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; नऊ वारकरी जखमी
राहुरी : टाकळीमियाँ येथील श्री दत्त सेवा मंडळ आषाढी वारी पायी दिंडीला आज (ता.३) पहाटे साडेपाच वाजता भोसेपाटीजवळ करकंब-पंढरपूर रस्त्यावर अपघात झाला. भरधाव वेगाने चाललेल्या पिकअप वाहनाने दिंडीच्या रथाला जोडलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. त्यात ९ वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. करकंब येथे चार जणांवर, तर अहिल्यानगर येथील रुग्णालयात पाच जणांवर उपचार सुरू आहेत.