

श्रीरामपूर : अपर पोलिस अधीक्षक कार्यालय व श्रीरामपूर तालुका पोलिसांनी तालुक्यातील मातुलठाण शिवारात गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपशाविरोधात संयुक्त कारवाई करत आठ ट्रॅक्टर, जेसीबी व दोन दुचाकी, असा ५४ लाख ६० हजार रुपयांच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक केली.