
श्रीगोंदे : परीविक्षाधिन पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने शनिवारी (ता.५) पहाटे तालुक्यातील घोडेगाव शिवारात कारवाई करीत ५ लाख ५५ हजार ६०० रुपये किमतीचा गुटखा व चारचाकी वाहन, असा ११ लाख ५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, एक आरोपी फरार झाला.