
अहिल्यानगर : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत काल सायंकाळी झालेल्या दोन कुस्त्यांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. दोन सख्खे भाऊ वेगवेगळ्या गटांत लढले. आणि सुवर्णपदक घेऊनच आखाड्याबाहेर आले. त्यांच्यावर वडिलांचे छत्र नसल्याचे निवेदकाने सांगितल्यावर उपस्थित सर्वच कुस्तीप्रेमींचा ऊर दाटून आला.