
पाथर्डी : शहरालगत असलेल्या वनदेव परिसरात एका सुवर्णकार व्यावसायिकाच्या मुलाला सहा ते सात जणांनी व्हिडीओ चित्रीकरण करत जबर मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (ता. १४) घडली. मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाला हाताला फॅक्चर झाले असून पाठीवर वळ पडले आहेत. मात्र मारहाण करणारांची मोठी दहशत असल्याने पालकांनी पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्यास असमर्थता दर्शवली.