कोरोनाने केली नगरकरांची नाकेबंदी, तब्बल १९ कंटेन्मेंट झोन

As many as 19 containment zones in Ahmednagar city due to corona disease
As many as 19 containment zones in Ahmednagar city due to corona disease
Updated on

नगर ः कोरोना गेल्या मार्च महिन्यात सुसाट सुटला होता. त्यामुळे भीतीचे वातावरम तयार झाले होते. परंतु या वर्षीही तीच पुनरावृत्ती होऊ लागली आहे. तो नगरकरांची नाकेबंदी करू लागला आहे.

शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता, महापालिकेने काल आणखी चार ठिकाणे मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर केली. त्यामुळे शहरातील मायक्रो कंटेन्मेंट झोनची संख्या 19वर गेली आहे. 

महापालिका आयुक्‍त शंकर गोरे यांनी आज माळीवाडा येथील नांगरे गल्लीतील न्यू सौरभ एजन्सी ते नमोह एजन्सी, बालिकाश्रम रस्त्यावरील वसंतविहार बिल्डिंग क्रमांक 1, सावेडीतील सावली सोसायटीतील आल्हाट घर ते लोंढे घर, आगरकर मळा भागातील समर्थ कॉलनीमधील अशोक जैन घर ते प्रल्हाद जोशी घर ते गोसावी घरापर्यंतचा परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. हा भाग एक एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे.

महापालिकेकडून या परिसरात जीवनावश्‍यक वस्तू सशुल्क पुरविण्यात येतील. शहरात सध्या 19 ठिकाणी मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. त्यांत सुमारे एक हजार नागरिक राहतात. आणखी दोन ठिकाणी मायक्रो कंटेन्मेंट झोन करण्याच्या सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे लवकरच हा आकडा आणखी वाढणार आहे. 

चौकट 
सहा दिवसांत 990 रुग्ण 
शहरात कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. आज 238 रुग्ण नगर शहरात आढळून आले. गेल्या सहा दिवसांत शहरात 990 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. हीच स्थिती राहिल्यास शहरात लॉकडाउन जाहीर केले जाण्याची शक्‍यता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com