नगरमध्ये तब्बल ९०० कोरोनाबाधित परतले घरी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.२२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजलेपासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १३५ ने वाढ झाली.

नगर: जिल्ह्यात आज ९०९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २४ हजार १५० इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.२२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजलेपासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १३५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३४४४ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५५, संगमनेर ०१, राहता ०३,  पाथर्डी २१,, नगर ग्रामीण ०५, श्रीरामपूर ०७, कॅंटोन्मेंट ०९,  नेवासा ०३, पारनेर ०५, राहुरी ०२, शेवगाव ०१, कोपरगाव ०१,  जामखेड ०२, मिलिटरी हॉस्पिटल १७, इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा - आदिवासी विद्यार्थ्यांना एक्सपायरी झालेले दूध

दरम्यान, आज ९०९ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा ३२२, संगमनेर ७१, राहाता ५९, पाथर्डी २१, नगर ग्रा.९५, श्रीरामपूर २३, कॅंटोन्मेंट १३,  नेवासा ५५, श्रीगोंदा ३२, पारनेर २०, अकोले ३७, राहुरी ४३, शेवगाव १४,  कोपरगाव २६, जामखेड १७, कर्जत १३, मिलिटरी हॉस्पिटल १० आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या: २४१५०, उपचार सुरू असलेले रूग्ण:३४४४, मृत्यू:४१६, एकूण रूग्ण संख्या:२८०१०

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As many as 900 corona patients returned home in Ahmednagar

Tags
टॉपिकस
Topic Tags: