
अहिल्यानगर : ओबीसी समाजाच्या आरक्षण टिकवण्यासाठी समता परिषद ही सातत्याने या विषयावर काम करणार आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले आहे. ईडब्ल्यूएसच्या सवलतीचा त्यांना १० टक्क्यांमधील साडेआठ टक्के लाभ मिळत आहे. ओबीसींच्या आरक्षणामध्ये मराठा आरक्षणाचा विषय घेऊ नये. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे. ओबीसीच्या हक्कांवर गदा आणू नये, अशी भूमिका समता परिषदेचे कार्याध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केली.