मराठा समाजाचा महावितरणच्या कार्यालयासमोर ठिया

अमित आवारी
Tuesday, 1 December 2020

महावितरण कंपनीत नगर जिल्ह्यातील सुमारे २०० कर्मचारी भरती प्रक्रियेत एसटीबीसी अर्थात मराठा उमेदवारांना कागदपत्रातून डावलण्यात आले आहे.

अहमदनगर : महावितरण कंपनीत नगर जिल्ह्यातील सुमारे २०० कर्मचारी भरती प्रक्रियेत एसटीबीसी अर्थात मराठा उमेदवारांना कागदपत्रातून डावलण्यात आले आहे. यासंदर्भात सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा यांच्यातर्फे मंगळवारी येथील महावितरणच्या अधिक्षक अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी महावितरण प्रशासनाचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे संजिव भोर, बाळासाहेब पवार, विशाल म्हस्के, रामदार भोर, प्रविण कोकाटे, राजेंद्र भगत आदी उपस्थित होते.

‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या...’, ‘एक लाख मराठा, लाख मराठा’, ‘महावितरणचा निषेध असो’, आदी घोषणाने परिसर दणाणून गेला. दरम्यान भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया सुरु होती.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Maratha community stood in front of the MSEDCL office