
अहिल्यानगर : सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यी पटसंख्या घटत असताना महानगरपालिकेच्या केडगाव येथील आयएसओ मानांकन प्राप्त ओंकारनगर प्राथमिक शाळेची पटसंख्या २० पटीने वाढली आहे. या शाळेच्या स्थापनेला १४ वर्षे पूर्ण होत असून, शाळेने आतापर्यंत विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन या शाळेसाठी आणखी दोन वर्ग खोल्यांना निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.