
अकोले : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा शुक्रवारपासून (ता. २१) सुरू झाली. अकोले तालुक्यात एकूण १५ केंद्रांवर ३९८३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. मात्र, प्रत्यक्षात ३९०६ विद्यार्थ्यांनी मराठी विषयाचा पेपर दिला. एकूण ७७ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. आठ दिव्यांग विधार्थी परीक्षेसाठी बसले असल्याची माहिती तालुका पर्यवेक्षक बाळासाहेब दोरगे यांनी दिली.