बेफिकिरी वाढली! कोरोनाला खुले आमंत्रण, बाजारपेठेत उडाला डिस्टन्सिंगचा फज्जाच

The market in Nevasa taluka is crowded without considering social distance
The market in Nevasa taluka is crowded without considering social distance
Updated on

नेवासे (नगर ) : अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नेवासे तालुक्यातील नेवासे, नेवासे फाटा, कुकाणे, घोडेगाव, चांदे आदी गावातील बाजारपेठेसह आठवडे बाजारात बेफिकिरी वाढत चालली आहे. मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचा विसर त्यांना पडला आहे.
     
आठवडे बाजार व स्थानिक बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंग न ठेवता गर्दी करणे, मास्क न लावणे ही नित्याची बाब झाली आहे. पोलीस येतात तेवढा वेळ नियमाचे पालन करायचे ते पुढे गेले की पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना दुसरीकडे नेवसेकरांची बेफिकिरी ही वाढत असल्याचे दिसते.
 
सोशल डिस्टन्सिंग ठेवा, विनाकारण घराबाहेर निघू नका, मास्कचा वापर करा, असे नेवासे शहरात नगर पंचायत व ग्रामीण भागात ग्रामपंचायती प्रशासनाने वारवार सांगून सुद्धा नागरिक त्याकडे गांभीर्याने लक्ष देतांना दिसत नाही. त्यामुळे प्रशासनही हतबल झाले आहे. तालुका प्रशासनाने थोडी कडक पाऊले उचलली पाहिजे. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्याविरोधात कारवाई केली पाहिजे. तसे झाले तर निश्चितच नागरिकांना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. तसे झाले तरच कोरोनाचा संसर्ग थांबवू शकणार. अन्यथा रुग्णांची संख्या वाढतच राहणार हे तेवढेच खरे आहे.

येथे होते नियमांची सरळ पायमल्ली

लॉकडाउनमुळे अनेक व्यवसाय बंद किंवा ठप्प झाले आहेत. त्यामुळे अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. सध्या सर्वात चांगला आणि लगेच सुरु होणारा व्यवसाय म्हणजे भाजीपाला विक्रीचा आहे. त्यामुळे अनेक तरुण या व्यवसायाकडे वळाले आहेत. त्याचा परिणाम शहरासह गावागावांत रस्त्यावरच  भाजीबाजार भरु लागला आहे. त्यामुळे याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावण्याच्या नियमांची सरळ पायमल्ली होतांना दिसते. याकडे प्रशासनाने गंभीरतेने लक्ष देऊन सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन सक्तीने करायला लावले पाहिजे.
 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com