काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी गावागावात सरकारच्या योजना पोहोचवा

सुनिल गर्जे
Saturday, 24 October 2020

राष्ट्रीय काँग्रेस वाढीसाठी व संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येक गावात, घराघरापर्येंत पक्षाची धेय्य- धोरणे, विचार व आघाडी सरकारच्या योजना पोहोचविणे गरजेचे आहे.

नेवासे (अहमदनगर) : राष्ट्रीय काँग्रेस वाढीसाठी व संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येक गावात, घराघरापर्येंत पक्षाची धेय्य- धोरणे, विचार व आघाडी सरकारच्या योजना पोहोचविणे गरजेचे आहे.

गरीब, सामान्य व्यक्तीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य द्या. केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगारविरोधी कायद्याची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनजागृती अभियान राबवावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनी केले.

नेवासे येथे गुजर व नेवासे तालुका काँग्रेसचे प्रभारी युवा नेते ज्ञानेश्वर मुरकुटे, नगरपंचायतचे प्रभारी बाळासाहेब चव्हाण यांच्या उपस्थितीत तालुका काँग्रेस पक्षाची आढावा बैठक झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. 

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे, कार्लस साठे, शहराध्यक्ष रंजन जाधव, प्रवीण तिरोडकर, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा सचिव जाकीर शेख, सुदाम कदम, सुरेंद्र मंडलिक यांनी उपस्थित होते.

ज्ञानेश्वर मुरकुटे म्हणाले, पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी प्रत्येक गावात काँग्रेसची शाखा व शाखाप्रमुख, गटप्रमुख, गणप्रमुख नेमून पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. यावेळी बाळासाहेब चव्हाण, संभाजी माळवदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी देवेंद्र कडु, संदीप मोटे, रमेश जाधव,आकाश धनवटे, सौरभ कसावणे, सचिन बोर्डे, चंद्रकांत पवार, तन्वीर शेख, नंदू कांबळे आदी उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting of Congress office bearers in Nevasa taluka