भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेचे आमदार उद्या शिर्डीत येणार एक स्टेजवर

दौलत झावरे
Saturday, 21 November 2020

राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचा उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता मेळावा रविवारी (ता. 22) शिर्डी येथे होणार आहे.

अहमदनगर : राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचा उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता मेळावा रविवारी (ता. 22) शिर्डी येथे होणार आहे, अशी माहिती शिक्षक परिषदेचे राज्य उपाध्यक्ष संजय शेळके व जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी दिली. 

परिषदेचे संस्थापक आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होणार आहे. त्याचे स्वागताध्यक्ष आमदार राधाकृष्ण विखे पाटील असून, आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. आमदार आशुतोष काळे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार लहू कानडे यांची उपस्थित असेल. दोन सत्रांत होणाऱ्या या मेळाव्यात संघटनात्मक, तसेच परिषदेच्या कामकाजाचा जिल्हावार आढावा घेऊन, संघटनेच्या कार्यकर्त्यांचे विचारमंथन होणार आहे.

या मेळाव्यास वेणूनाथ कडू, राजेश सुर्वे, संजय पगार, मधुकर उन्हाळे, सुरेश दंडवते, रावसाहेब रोहकले उपस्थित राहणार आहेत, असे राजेंद्र जायभाय, आर. पी. रहाणे यांनी सांगितले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting of Primary Department of State Teachers Council in Shirdi on Sunday