esakal | ‘के. के. रेंज’मध्ये देवेंद्र फडणवीसांनी काय केले पाहावे लागेल
sakal

बोलून बातमी शोधा

Meeting of Revenue Minister Balasaheb Thorat on KK Range issue in Nagar district

के. के. के. रेंज जमिनअधिग्रहणबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात जमीन हस्तांतरप्रश्‍नी काही निर्णय झालेला आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यात येईल.

‘के. के. रेंज’मध्ये देवेंद्र फडणवीसांनी काय केले पाहावे लागेल

sakal_logo
By
सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : के. के. के. रेंज जमिनअधिग्रहणबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात जमीन हस्तांतरप्रश्‍नी काही निर्णय झालेला आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यात येईल.

के. के. रेंजच्या जमीन हस्तांतरास राज्य सरकारचा विरोध असल्याचे सांगत न्यायालयात दाद मागणे हा शेवटचा पर्याय आहे. याप्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी लवकरच महसूल, वन व मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांसोबत बैठक घेण्यात येऊन ठोस निर्णय घेण्यात येईल, असे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.
 

मुंबई येथे मंत्रालयात नगरविकास उर्जा, आदीवासी तसेच उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार नीलेश लंके यांचे प्रतिनिधी वनकुट्याचे सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे, निघोजचे सरपंच ठकाराम लंके, कामगार नेते दत्ता कोरडे, राजू रोडे यांनी के. के. रेंज जमिन अधिग्रहणबाबत थोरात यांची भेट घेऊन याबाबत राज्य सरकारची भुमिका व इतर बांबीवर सविस्तर चर्चा केली.


महसूलमंत्री थोरात म्हणाले, लष्कराकडून राज्य सरकारने जमीन हस्तांतरीत करून घेतली असेल तर त्या बदल्यात लष्करास जमीन हस्तांतरीत करणे बंधनकारक असते. परंतू त्यासाठी नगर जिल्ह्यातीलच जमीन देणे बंधनकारक नाही. निर्णय काहीही असो या भागातील आदीवासी व शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. या भुमीकेवर आपण ठाम आहोत. बागायती क्षेत्राचे हस्तांतर मनात आणने हेच पाप आहे. याप्रकरणी शरद पवार यांचे सहकार्य घेण्यात येईल. त्यांची भेट घेउन संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याजवळ जमीन हस्तांतरणास ठाम विरोध दर्शविला जाईल.

शासनाने लष्करास इतर ठिकाणची जमीन हस्तांतरीत करण्याचा पर्याय निवडावा असेही थोरात यांनी स्पष्ट केले.

संपादन : अशोक मुरुमकर