दहेगाव बोलकातील वलटे यांचे स्मारक प्रेरणादायी ः आशुतोष काळे

मनोज जोशी
Monday, 12 October 2020

शहीद वीर जवान नायब सुभेदार सुनील वलटे यांच्या बलिदानामुळे तालुक्याने शूर भूमिपुत्र गमावला असून त्यांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

कोपरगाव : तालुक्याचे सुपुत्र वीर जवान नायब सुभेदार सुनील वलटे देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असतांना हुतात्मा झाले. त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानातून व त्यांनी दाखविलेल्या शौर्याची तरूण पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी दहेगाव बोलका ग्रामस्थांनी त्यांचे स्मारक उभारले हे खरोखर अभिमानास्पद आहे.

शहीद वीर जवान नायब सुभेदार सुनील वलटे यांच्या बलिदानामुळे तालुक्याने शूर भूमिपुत्र गमावला असून त्यांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

सराला बेटाचे मठाधीपती महंत ह.भ.प रामगिरी महाराज यांच्या हस्ते समस्त ग्रामस्थ दहेगाव बोलका,स्मारक समिती व शहीद परिवार यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या शहीद स्मारकाचे अनावरण आज करण्यात आले.

आमदार आशुतोष काळे यांनी श्रद्धांजली वाहून पुष्पचक्र अर्पण केले त्याप्रसंगी ते बोलत होते. य शिरसगाव (श्रीरामपूर)ग्रामपंचायतीच्या वतीने शहीद जवान वलटे यांच्या कुटूंबियांना 50,000 रुपयांचा धनादेश आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल कटके, काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, वीरपिता रावसाहेब वलटे, वीरमाता सुशीला वलटे, वीरपत्नी मंगल वलटे, भाऊ अनिल वलटे, मुलगा वेदांत वलटे, जगन बागल, अनिल वलटे, अशोक भोकरे, भास्कर वलटे, रावसाहेब आभाळे, गुलाबराव देशमुख, आबा रक्ताटे व ग्रामस्थ उपस्थित होते.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The memorial of Martyr Jawan Valte is inspiring