esakal | अॉनलाईनविरोधात व्यापारी ठरवणार रणनीती, कोपरगावात रविवारी मेळावा
sakal

बोलून बातमी शोधा

Merchants will decide for a strategy against online

या विषम स्पर्धेला वाचा फोडण्यासाठी व्यापारी महासंघाने पुढाकार घेतला. येत्या रविवारी (ता.20) राहाता, कोपरगाव, येवला व श्रीरामपूर तालुक्यातील व्यापा-यांचा मेळावा कोपरगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

अॉनलाईनविरोधात व्यापारी ठरवणार रणनीती, कोपरगावात रविवारी मेळावा

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

शिर्डी ः भांडवलदार कंपन्यांचे माल आणि आॅन लाईन खरेदि सुविधा यामुळे गावपातळीवरील छोटे मोठे व्यावसाईक हळूहळू अडचणीत येऊ लागले. यंदाच्या दिवाळीत झाडू, दीपवाती आणि पणत्या विक्रेत्यांपासून मोठ्या किराणा व कापड व्यापा-यां पर्यत सर्वांनाच त्याचा मोठा फटका बसला.

या विषम स्पर्धेला वाचा फोडण्यासाठी व्यापारी महासंघाने पुढाकार घेतला. येत्या रविवारी (ता.20) राहाता, कोपरगाव, येवला व श्रीरामपूर तालुक्यातील व्यापा-यांचा मेळावा कोपरगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी भाजपचे केंद्रीय नेते शाम जाजू व मराठा चेंबर आॅफ काॅमर्स चे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांना निमंत्रित करण्यात आले आहे. 

या बाबत सकाळशी बोलताना व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे म्हणाले, पूर्वीप्रमाणे दहा लाखांच्या पुढे लोकसंख्या असलेल्या महानगरातच माॅल असावेत. ग्रामीण भागात सुरू झालेल्या माॅल मुळे छोटे, मध्यम व मोठे व्यावसाईक देखील अडचणीत आले आहेत. हे असेच सुरू राहीले तर पुढील काही वर्षात ग्रामीण अर्थव्यवस्थाच अडचणीत येईल. 

व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधिर डागा म्हणाले, आम्ही कोपरगाव येथून सोळा किलोमिटर अंतरावर असलेल्या माॅलमधून एक लिंबू आॅन लाईन मागविले. आश्चर्य असे की चार रूपये किंमतीचे वेष्ठण लावून हे लिंबू आम्हाला बाजारभावाच्या तुलनेत कमी किंमतीत घरपोच मिळाले.

फळे भाजीपाला, किराणा, कापड, भांडी, इलेक्ट्राॅनिक्स वस्तू अशा विवीध वस्तू विकणारे दोन हजाराहून अधिक व्यापारी राहाता व कोपरगाव तालुक्यात आहेत. या सर्वांना या माॅलचा फटका बसतो आहे. भांडवलाच्या जोरावर अधिक खरेदि आणि स्वस्त दर यामुळे सामान्य व्यापारी त्यांच्यापुढे टिकाव धरू शकणार नाहीत. काही वस्तु खास त्यांच्यासाठी कमी वजनाच्या उत्पादीत करून दिल्या जातात. प्रसंगी ग्राहकांची दिशाभुल होते. हा मुद्दा देखील मेळाव्यात मांडला जाईल.

दिवाळीच्या काळात पणत्या, फुलवाती, विवीध रंगातील रांगोळी, आकाशदिवे, झाडू, लाह्या बत्ताशे, अगरबत्ती, अत्तर, हिशोबाच्या वह्या व चोपड्या यासह पुजेच्या सर्व वस्तू या माॅलच्या माध्यमातून ग्राहकांना तुलनेत स्वस्त दरात ग्राहकांना घरपोच पुरविण्यात आल्या. त्यामुळे या वस्तुंची विक्री करून दिवाळी साजरी करणारे रस्त्यावरील सामान्य विक्रेते पुरते निराश झाले. हि मंडळी या विषम स्पर्धेत टिकू शकणार नाहीत. 

मराठा चेंबर आॅफ काॅमर्स हि नोंदणीकृत व नामांकित संस्था आहे. या संस्थेमार्फत ग्रामीण भागातील सामान्य व्यापा-यांना या संकटातून वाचविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपूरावा करायचा आहे. त्यासाठी या संस्थेचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांना तर हि मागणी केंद्रातील भाजपच्या मंत्र्यापुढे मांडण्यासाठी भाजपचे केंद्रीय नेते शाम जाजू यांना रविवारच्या मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

- काका कोयटे,अध्यक्ष, व्यापारी महासंघ.