27 जुलैपासून दुध खरेदी बंद; दूध उत्पादक दूधसंघ आले अडचणीत... 

_milk-production.
_milk-production.
Updated on

कोपरगाव (नगर) : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर पॅकिंग दूध व दुग्धजन्य पदार्थांची घटत चाललेली विक्री, दूध पावडरचे घसरलेले दर, पशु चारा, औषधे, मिनरल मिक्सचरचे गगनाला भिडत चाललेले दर तर महानंदने 27 जुलैपासून दुध खरेदी बंद करण्याचा घेतलेला निर्णय दूध उत्पादकांच्या मुळावर घाव घालणारा असून त्यामुळे सहकारी तत्त्वावरील दूध उत्पादक, दूधसंघ अडचणीत आले आहेत. ही सहकाराची चळवळ बंद न पडण्यासाठी उत्पादित होणाऱ्या सर्वच दुधाला पाच रुपये प्रति लिटर अनुदान देण्यात यावे, अशी मागणी गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजने यांनी केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पशु व दुग्ध विकास मंत्री, सचिव, आयुक्त यांना पाठविलेल्या निवेदनात त्यांनी ही मागणी केली आहे.

निवेदनात परजणे यांनी म्हटले कि, तालुक्याच्या व तालुक्याबाहेरील दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी पंचेचाळीस वर्षापासून गोदावरी दुध संघ कार्यरत आहे. कोरोणाचा प्रादुर्भाव वाढत असून त्याचा दूध व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असून दुधाची मागणी घटत आहे. राज्य शासन महानंदा यांच्यामार्फत सहकारी दूध संघाचे एकूण संकलन पैकी नाम मात्र खरेदी करत आहे. त्यातही 27 जुलैपासून सदर खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूध उत्पादकांना खरेदी केलेल्या दूध दराप्रमाणे दुधाचा दर द्यावा लागत आहे. पर्यायाने सहकारी संघांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दूध उत्पादक यांची परिस्थिती अधिक बिकट झाली असून उत्पादित केलेल्या दुधा इतपत खर्चदेखील भागविता येणे शक्य नाही. अशा परिस्थितीत पशुधन विकण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय राहणार नाही. पशुधन एकदा विकले गेले की परत पुढील चार ते पाच वर्ष दुधाळ जनावरांसाठी कालावधी लागणार आहे .या सर्व बाबींवर मात करण्यासाठी व राज्याला दुधाचा तुटवडा होऊ नये म्हणून उत्पादित होणाऱ्या सर्व दुधाला अनुदान मिळणे आवश्यक आहे .अल्पभूधारक शेतकरी ,शेतमजूर ,अल्प बचत गट, सुशिक्षित बेरोजगार यांचा दूध व्यवसायावर उदरनिर्वाह अवलंबून आहे. दूध व्यवसाय मोडकळीस आल्यास या सर्वांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल .दुधाचे दर अस्थिर होऊन या सर्वांच्या जीवनावर त्याचा परिणाम होईल तरी दूध उत्पादकांनी उत्पादित केलेल्या सर्व दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळावे अशी मागणी परजने यांनी केली आहे

संपादन : सुस्मिता वडतिले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com