
अहिल्यानगर : शासन आता सोळावा वित्त आयोगाचा निधी देणार आहे. यापूर्वीच्या तेराव्या १४ व्या व १५ व्या वित्त आयोगाचा निधी देताना आलेल्या अडचणी समजावून घेण्यासाठी शासनाने समिती नियुक्त केली आहे. पूर्वीच्या अडचणी टाळण्यासाठी व नव्याने फायदेशीर सूचना घेण्यासाठी आलेल्या सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षांसह समितीसोबत पद्मश्री पोपटराव पवार यांनी चर्चा केली. लोकसंख्येच्या आधारे ग्रामपंचायतीला मिळणारा निधी अल्प आहे. त्यामुळे लोकसंख्येने लहान असलेल्या ग्रामपंचायतींना किमान पंधरा ते वीस लाखांपर्यंत निधी मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे.